मी केवळ शांत राहिलो

मी जे पाहिले, जे ऐकलेकेवळ सोशीत राहिलोना बोललो, आक्रन्दीलोमी केवळ शांत राहिलो मानवत्व जाताना लयासते उग्रतेने मी पाहिलोदोन अश्रू मीच माझेअग्निस त्याच्या वाहिलोपणना बोललो, आक्रन्दीलोमी केवळ शांत राहिलो देव जाणे कित्येक वर्षेस्वतःशी खोटा राहिलोही शांतता खोटीच आहेहे सांगताना मी स्तब्धलोपणना बोललो, आक्रन्दीलोमी केवळ शांत राहिलो ना बोलणे ह्यांच्या प्रतिना बोलणे त्यांचा प्रतिना दुःख ह्यांना राहिलेनाContinue reading “मी केवळ शांत राहिलो”

सोबत

मीच माझ्या सोबतीलाआज वाटे छेडलेबंध आमुच्या प्रीतीचेआज ढिल्ले सोडले तिचीच प्रीती हो बरीअसे काहीसे वाटलेमग मीच माझ्या सोबतीलापरक्या गटात टाकले बाह्य भौतिक ती जरीजखडून तिने ठेवलेऐनवेळी किनाऱ्यालामाझ्या सोबतीला त्यागले मग तीच माझी सोबतदुरून तिने बोललेएकटा आलास आहेअन जायचेही एकले नियाज मुलाणी अर्थात इथे दोन सोबती अभिप्रेत आहेत. एक स्वतःची  स्वतःला असलेली सोबत आणि एक मानवीContinue reading “सोबत”

माझे वैराग्य

मी रमलो, मी गुंतलोमी पाहिले, मी अपेक्षिलेमी खचलो, मी उठलोमी घेतले, मी वाहिलेमी आनंदलो, मी गुंगलोमी हरवले, मी शोधलेमी आसुसलो, मी वासलोमी जपले, मी जोपासलेमी रागलो, मी लोभलोमी जिंकले, मी हारलेमी भावलो, मी भिलोमी इंद्रियांना पोसलेमी भावनांना ठेचलेमी प्रीतिभाव वेचलेमी हेतुभाव गायिलेमी जगलो, मी जगविलेमी वैराग्य पाहिले – नियाज मुलाणी

मी जिवंत आहे…

हसण्यात माझ्यारडण्यात माझ्यासुखात माझ्यादुःखात माझ्यामी जिवंत आहेजगण्यात माझ्या जरासा कटू मीजरासा मी स्वार्थीअसंयमी तसा मीहळवा त्या अर्थीपण स्वभावात माझ्यामी जिवंत आहे राग ही जरासाभयभीत ही होतोकधी चिंतीत असतोकधी प्रीतीत असतोपण भावनात माझ्यामी जिवंत आहे शब्दात माझ्याकवितेत माझ्यामाणसात माझ्यामरणात माझ्यामी जिवंत आहेजगण्यात माझ्या – नियाज मुलाणी

संवाद

मन हे माझे पाषाणाचेतू इथे येऊस नाहीशेकडो मी यत्न केलेनिर्झरास वाट नाहीअयोग्य तुजला मी सखेमी योग्यतेचे स्थान नाहीतू कितीही सत्य असलीतेवढा मी सत्य नाहीमान्य मजला आसवांचामेघ तो बरसेल काहीत्या आसवांच्या न्यूनतेलाहे सखे मी साध्य नाहीक्षणभराच्या त्या सोबतीलाधन्य मी झालो तरीहीपण सोबतीला, ह्या सखेप्रीतीचा तो गंध नाहीहे सखे मी जाणतो गमी तुझा आरोपी आहेसिद्धता माझ्या गुन्ह्याचीहाचContinue reading “संवाद”

आशा

या आकाशातून साऱ्यारक्तपात माजला होतासरणावर निजण्यासाठीभास्कर तो सजला होता शेकडो मशालींचा ज्यानेसंसार थाटला होताअग्निस तया जाण्याचातो थाटच आगळा होता आजीव हा सारा इथलाकाळोखात जो सजला होतातारकारुपी दुःखाचा, नयनीअश्रू तो दाटत होता मिटून लोचन सारे, तोआसमंत निजला होताविझवुन मशाली साऱ्याभास्कर ही मिटला होता तेवढ्यात तिकडे काजवाआरास ही सजवत होतात्या टिंब टिंब दिव्यांनीप्रकाशित आसमंत होता कालांतराने तोContinue reading “आशा”

शब्ददूत

हे कृष्णनभा तू भेटी येशीशब्द थोडके धाडून नेशीहृदय माझे ते दूर देशीलथिजले, त्यांना स्पंदन देशी स्पंदनांत तू सांग कुशल मीमंगल माझे भावगीत हीशुष्क, निरस प्रांती मी असलोआठवात शोधली सुखे ती त्यांचे मंगल पाहून पाहून घे रेसख्यासमवेत धाडून दे रेउभा तो तिकडे प्रीतीपीपासूअचल, अचलावरी अशी ओळख दे रे पाहून घेशील स्मित ते अलगदआहे का ओठांवर त्याContinue reading “शब्ददूत”

निनावी आणि नग्न

येशील का परतुनी तूप्राण हा दुभागालाएक होता एक राहीलआभास केवळ राहिला सत्यता जी प्राप्त झालीस्वीकार्यता नाही तिलादाटला तो आवाज माझाआज आसमंती साठला येशील का परतुनी तूसिद्धता ती द्यायलादेशभक्ती, देशप्रेमाचेप्रमाण द्यायला हत्यारा ही आज इथेदेशभक्त ठरू लागलाअन देशभक्तीवर माझ्याधर्माचा शिक्का लादला येशील का परतुनी तूआहुती पुनः द्यायलाआहुतीला रे पित्या तवनिरर्थ केवळ राहिला सांडलेल्या तुझ्या लहुचीसाक्ष घेऊनContinue reading “निनावी आणि नग्न”

ती कोण होती?

मला लोक नेहमी विचारतातती कोण होती? ती होती कलाकारलांबट केस काळेशारएकच बट गालावरखट्याळ थोडी सुंदर फार कुंचले हे शस्त्र तिचेकमरेत रोवून ही तयारपॅलेट वरचे रंग जणूकुंचल्याना लावती धार ही धार थोडी वेगळी असतेती असते मऊशारकधी लाल कधी निळीकधी नुसती हिरवीगार कुंचल्यांचे फटके तिचेअहो किती रंगतदारफिक्या फिक्या आयुष्यालालावते चांदण्या तीन चार माझाही आयुष्य होतकॅनव्हासपरी फिकं फारपंढर्यातूनContinue reading “ती कोण होती?”

स्मशान शांतता

ओठांवरती जे शब्द येतातजे तिथेच मूक गिळून बसतातज्या शब्दांना भावनांची अनुभूतीदाखवत येत नाही, तीस्मशान शांतता. काही शब्द एवढेही थोर नसतातकाही शब्द एवढेही शूर नसतातअश्या शब्दांची जी थडगीमनात बनतात, तीस्मशान शांतता. माणसांचे ढीग च्या ढीग समोर आहेतकाही प्रिय आहेत काही अप्रिय आहेततरीपण माझ्या शब्दांच्या मनात घुसमट आहेप्रत्येक नात्याला कोणत्यातरी शब्दाचीभीती आहे, ती भीती,स्मशान शांतता चविष्ट शब्दांनी,Continue reading “स्मशान शांतता”

Create your own website, free on WordPress.com.Create your own website.
Start free