मीच माझ्या सोबतीला
आज वाटे छेडले
बंध आमुच्या प्रीतीचे
आज ढिल्ले सोडले
तिचीच प्रीती हो बरी
असे काहीसे वाटले
मग मीच माझ्या सोबतीला
परक्या गटात टाकले
बाह्य भौतिक ती जरी
जखडून तिने ठेवले
ऐनवेळी किनाऱ्याला
माझ्या सोबतीला त्यागले
मग तीच माझी सोबत
दुरून तिने बोलले
एकटा आलास आहे
अन जायचेही एकले
नियाज मुलाणी
अर्थात इथे दोन सोबती अभिप्रेत आहेत. एक स्वतःची स्वतःला असलेली सोबत आणि एक मानवी सोबत, जी दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला मिळते. आपली स्वतःची स्वतःला असलेली सोबत ही शाश्वत असते निदान मृत्यूपर्यंत तरी. पण मानवी सोबत नाही. ती कधीही परकी होऊ शकते.
कवितेत असं सांगितलं आहे की कवीने मानवी सोबतीला अधिकच महत्व दिलं, त्यासाठी स्वतः स्वतःला दिलेल्या सोबतीला त्याने दुर्लक्षित केला. आणि जेंव्हा वेळ तेंव्हा ती मानवी सोबत सोडून निघून गेली. मग माझी जी स्वतः ची सोबत होती ती मला जवळ घेऊन म्हणाली की आपण येताना ही एकटे येतो आणि जातानाही एकटेच असतो फक्त स्वतःला सोबत असते स्वतःची.
खूप छान दादा…..!❣️❣️
LikeLike